पांगरी (गणेश गोडसे) -: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सायकलस्वारास जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शेतातुन घराकडे दुध घेऊन निघालेला सायकलस्वार गंभी जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 8 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्‍याच्या सुमारास पुणे-लातुर राज्यमार्गावर पुरी शिवारात घडली.
    बजरंग मारूती दिडवळ (वय 55, रा.पुरी, ता.बार्शी) असे एस टी बसने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात गंभिर जखमी झालेल्यांचे नांव असुन त्यांच्यावर बार्शीच्या खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असुन प्रकृती चिंताजनक आहे. दशरथ दयावान बांगर (वय 44, रा.बांगरवाडी, ता.कळंब, जि.उस्मानाबाद) या एस.टी.चालकाने पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते एम एच 20 बीएल 2131 ही कणकवली आगाराची बस बार्शी येथुन प्रवाशी घेऊन पांगरीमार्गे लातुर कडे जात असताना पुरी शिवारात बस आली असता जखमी बजरंग दिडवळ हे सायकलस्वार अचानक समोर आले. मुळे ते जखमी झाल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. चलक बांगर यांच्या फिर्यादिवरूण पांगरी पोलिसात अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top