पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता.बार्शी) येथे शनिवारी दि. 10 मे रोजी अजमेर शरीफ येथील प्रसिध्‍द सुफी संत हजरत ख्वाजा मईनुदीन चिश्ती गरीब नवाज यांचा 802 वा ऊरूस अजमेर येथे मोठया भक्तीभावात साजरा होत असुन त्याच उत्सवाच्या निमित्ताने पांगरी येथेही हजरत वली सिकंदर शाह कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्स गरीब नवाज छटी शरीफ कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे.
     पांगरी येथील झानपुर रस्त्यावरील सुफी नगर येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता मोठया उत्साहात व भक्तिभावात कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. सायंकाळी प्रवचनाचा कार्यक्रम होणार असुन त्यानंतर कव्वाली व समा या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. तरी भाविकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहुन याचा लाभ घ्यावा असे आवाहन वली सिकंदर शाह,  कादरी ट्रस्टचे अध्यक्ष सत्तार बागवान यांनी केले आहे.
 
Top