पांगरी (गणेश गोडसे) :- कारी (ता. बार्शी) येथे गावठानासह गावातील व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाने व अनियमित होत असुन पुर्ण क्षमतेने विजपुरवठा करावा, अशी ग्रामस्थांसह व्यापारी व शेतक-यांची मागणी असुन कारी परिसरात तात्काळ सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी कारी ग्रामस्थांनी एका लेखी निवेदनाद्वारे विज वितरण कंपनीच्या बार्शी येथील कार्यालयाकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कारी गावासह परिसरातील दहा ते पंधरा गांवांना पांगरी येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रातुन विजपुरवठा केला जातो. मात्र अलिकडील काही महिन्यांपासुन विद्युत उपकेंद्रातुन शेती, घरगुती आदींसाठी होणारा विजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत आहे. त्यामुळे शेतात अनेकांच्या मोटारी चालु शकत नाहीत तर कांहींच्या मोटारी सुरू झाल्यानंतर पुन्हा कायमच्या बंद पडत आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.
काही ठिकाणी विहीरींना पाणी उपलब्ध असुनही केवळ विज वितरण कंपनीच्या अनियमित विज पुरवठयामुळे व वेळेत होणा-या सततच्या बदलामुळे शेतकरी राज हैराण झाला आहे. दिवसांतुन साधारणतः 30 ते 40 वेळा विज ये-जा करते. सध्या उन्हाळयांचे दिवस सुरू असल्यामुळे वयोवृदधांसह लहान बालकांना विज कंपनीच्या असहकाराचा फटका बसत आहे. विजेच्या लपंडावाची ही परिस्थती अजुन किती दिवस रहाणार असा प्रश्न कारी ग्रामस्थांसमोर उभा असुन विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी याकडे लक्ष केंद्रित करून विजपुरवठा सुरळीत करून लोकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर प्रविण डोके लक्ष्मण लोहार सुधाकर गादेकर महेश चालखोर आदी ग्रामस्थांच्या सहया आहेत.