सोलापूर :- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल यांनी श्री शिवछत्रपती सर्वोपचार जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या आंबे गावातील विष बाधित रूग्णांची भेट घेऊन विचारपूरस केली.
यावेळी त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, अधिष्ठाता डॉ. एस.व्ही. घाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. बी. चौधरी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गाडगीळ आणि प्रांताधिकारी शहाजी पवार व श्रीमंत पाटोळे यांच्यासह डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी उपस्थित होते.
पंढरपूर तालूक्यातील आंबे गावात देवाच्या यात्रेतील प्रसाद खाल्याने विषबाधा झालेल्या लोकांना येथील सर्वोपचार जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सर्व रूग्णांची पालकमंत्री सोपल यांनी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर देऊन तेथील सर्व डॉक्टरांना योग्य वैद्यकीय सुविधा पूरविण्याच्या सुचना दिल्या.