बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: प्रत्येक उन्हाळा (वसंत ऋतु) मध्ये श्री भगवंताच्या मुर्तीस चंदनाची उटी लावण्यात येते. चैत्र शुध्द प्रतिपदा ते ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा या काळात नियमितपणे उटी लावण्यात येते. भक्त दक्षिणेच्या स्वरुपात या सेवेचा लाभ घेतात. या उटीचंदनाच्या सेवेसाठी ४०० ग्रॅम चंदन उगाळून त्यामध्ये अष्टगंध, केशर, गुलाबपाणी यांचे मिश्रण करण्यात येते. यानंतर आकर्षकपणे हे मिश्रण मुर्तीस लावण्यात येते. कैरीचे पन्हे, उसाचा रस इ नैवेद्य दाखविण्यात येतो. ज्या भक्तांनी सेवा घेतली त्यांना या उटीचा गंध, श्रीफळ प्रसाद म्हणून देण्यात येतो. चंदन हे सर्व वृक्षांत श्रेष्ट व आयुर्वेदातही त्याचे महत्व आहे, दाह शमन करणारे, सुगंध देणारे, मन व शरिरास उपयुक्त असल्याने चंदनाच्या उटीस विशेष महत्व असल्याचे योगेश बडवे पुजारी यांनी सांगीतले.
 
Top