उमरगा : येळी (ता. उमरगा) येथील एका तरुणाने लिंबाच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. 8 मे रोजी पहाटे घडली.
अमोल विश्वनाथ माने (32, रा. येळी, ता. उमरगा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अमोल माने हे पत्नीस शौचास जाऊन येतो, असे म्हणून ते घरातून बाहेर पडले. त्यांच्या नातेवाइकांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विश्वनाथ हणमंत माने यांनी दिलेल्या माहितीवरून उमरगा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार श्रीनिवास आरदवाड करीत आहेत.