बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोसायटीचे कर्ज काढलेली रक्कम डिसीसी बँकेतून गावाकडे घेऊन जाणार्या शिक्षकाची बॅग ब्लेडने कापून बार्शी बसस्थानकावरुन अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
उस्मानाबाद येथील रहिवासी अलिम शेख हे काटेगाव (ता.बार्शी) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर शिक्षक सोसायटी येथून त्यांच्या वैयक्तिक अडचणीसाठी कर्जप्रकरण करुन त्यांनी धनादेश घेतला होता. काटेगाव येथील शाखेमध्ये अडीच लाखाची रक्कम एकदम देण्यासाठी उपलब्ध नसल्याने त्यांनी बार्शी शहरातील शाखेतून रक्कम घेण्यासाठी व त्या शाखेत खाते असलेल्या ओळखीच्या व्यक्तीला घेऊन येण्यास सांगीतले. त्यानुसार सोसायटीचे सेवक बाळू लोखंडे या ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यावर रक्कम वर्ग करुन देण्यास बँकेने मंजूरी दिली. त्यानुसार तेलगिरणी चौक येथील डिसीसी बँकेच्या शाखेतून त्या दोघांनी रक्कम स्विकारली. सदरची रक्कम घेऊन बार्शी बसस्थानकावर आल्यानंतर उस्मानाबाद येथे गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये चढतांना त्यांची बॅग ब्लेडने कापून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी समोरच असलेल्या बार्शी पोलिस ठाण्यात येऊन चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार बार्शी पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.