उस्मानाबाद -: शहराचा विकास करण्यासाठी आपलं शहर स्वच्छ व सुंदर शहर करावं लागेल. एखादयाची गरज दुस-याचा व्यवसाय व्हावा या दृष्टीने कॅरी बॅग पर्यायी कापडी बॅग तयार करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने उद्योजक तयार करावे लागतील. सुंदर शहरासाठी कॅरी बॅग मुक्ती गरजेची असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले.
बालाजी मंदीरात जिल्हा व्यापारी महासंघ व नगर परिषद, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद शहर कॅरी बॅग मुक्त अभियानाबाबत आयोजित बैठकीत बोलतांना केले.
या बैठकीस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर, विक्रीकर अधिकारी श्री.जाधव, व्यापारी महासंघाचे संजय मंत्री, लक्ष्मीकांत जाधव, श्याम बांगड, शितल मेहता, दत्ता बंडगर,चंद्रकांत गार्डे, अनिल उंबरे, भाऊसाहेब डोके, किसन भन्साळी, नारायण भन्साळी, भाऊसाहेब भन्साळी, बबलू कुलकर्णी, प्रशांत तडवळकर, अलीम सौदागर, श्री.देवगुडे आदिंची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे पुढे म्हणाले की, स्वच्छता करतांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवावा लागेल व याची सवय व्यापाऱ्यांनी करुन घ्यावी. यासाठीच मी वॉर्डनिहाय नगरसेवकांमार्फत बैठका घेऊन स्वच्छतेची माहिती घरोघरी जावी यासाठी प्रयत्न करणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी व्यापारी दृष्टीकोनातून व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. येथील व्यापाऱ्यांचा पुढाकार हा कौतूकास्पद आहे. त्यांच्या सहकार्याची गरज आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी न.प.चे मुख्याधिकारी चारठाणकर म्हणाले की, कॅरीबॅग मुक्तीचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केला आहे. शहरात दररोज 40 टन कचरा निघतो आहे. व्यापारी वर्गाला हा विषय समजावा या उद्देशानेच या बैठकीचे आयोजन केले आहे. 50 मायक्रॉन पेक्षी कमी जाडीच्या कॅरी बॅगवर बंदी आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यापारी महासंघाच्या वतीने संजय मंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले व त्यांनी कॅरीबॅग मुक्तीसाठीच्या अभियानास व्यापारी महासंघाचे सहकार्य राहील असे सांगून येणा-या अडीअडचणी मांडल्या. या बैठकीचे सूत्रसंचालन रविंद्र केसकर तर आभार जाधव यांनी मानले.