पांगरी (गणेश गोडसे) :- वाहनभाडयाची बाकी मागण्‍याच्या उदेशाने चालकाने दुकानात घुसुन एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गोरमाळे (ता. बार्शी) येथे भरदिवसा घडली.
    अशोक त्रिंबक झोरी (वय 34, रा. गोरमाळे, ता. बार्शी) असे विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे. विनयभंग पिडीत मुलीने स्वतः पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपीच्या वाहनात तिच्या वडीलांनी किराणा दुकानाचा माल भरून दिला होता. माल उतरवल्यानंतर आरोपीने फिर्यादीस बाकी मागण्‍याच्या इरादयाने भेटुन तिला लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत तिच्या अंगाशी झोबाझोंबी केली व तिचा विनयभंग केला असे फिर्यादित म्हटले आहे. अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात अशोक झोरी या तरूणाविरूदध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपी फरार झाला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top