पांगरी (गणेश गोडसे) :-  ओव्हरटेक करताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने चारचाकी वाहनास पाठीमागुन घासल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना पुणे-लातुर राज्यमार्गावरील घारी शिवारातील जाभळबेटात घडली.
    गणपत धर्मा चव्‍हाण व अमोल सर्जेराव गायकवाड (दोघेही रा. कारी, ता.बार्शी) अशी अपघातात जखमी झालेल्या दोघांची नांवे आहेत. संजीव दिलीप मुळुक (रा. कसबे तडवळे, ता.जि.उस्मानाबाद) यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, ते त्यांच्या ताब्यातील एम.एच 25 एबी 2111 ही इंडिका गाडी बार्शीहुन पांगरीमार्गे तडवळेकडे घेऊन जात असताना पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच.13 एएल 2136 च्या चालकाने गाडी ओव्हरटेक करण्‍याच्या प्रयत्नात त्यांच्या पाठिमागील चाकास धडक बसली. अपघातातनंतर दुचाकीचालकासह दोघेजन रस्त्याच्या कडेच्या खडयात जावुन पडले. जखमीना उपचारासाठी पांगरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. पांगरी पोलिसात अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top