पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) परिसरासह शेजारील उस्मानाबाद जिल्हयातील भानसगांव येथे बुधवारी वादळी वारा व विजेच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला असुन भानसगांव येथील दोन महिला वादळ वा-यांमुळे जखमी झाल्या. गावातच एकाच्या घरावर जुने मोठे पिंपळाचे झाड कोसळले. मात्र घरात कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली. मात्र वादळी वा-याने भानसगावातील साधारणतः साठ टक्के घरावरील पत्रे उडुन जावुन अणेकांचे संसार उघडयावर आले आहेत.
सिता जयराम गरड (वय 32) व सिमा बालाजी कदम अशी जखमी झालेल्या महिलांची नांवे असुन सौ. गरड यांच्यावर बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाजी छबु दुधे, धर्मराज मारूती दुधे, रामलिंग आत्माराम कदम, संतोष जगन्नाथ पाटील, हनुमंत श्रीमंत सोलवट, तातोबा गेना पवार, बाबुराव आबा पवार आदींच्या घरावरील पत्रे व संसारोपयोगी साहित्य वादळी वा-यात उडुन गेले. तर दत्ता नवनाथ खैरै यांच्या घरावर पिंपरनीचे मोठे विस्तीर्ण झाड कोसळले मात्र घरात कोणी नसल्यामुळे जिवितहानी टळली. भानसगावचे ग्रामसेवक व इतरांनी तात्काळ गावातील नुकसानग्रस्त घरांची पाहणी करूण त्याचे पंचनामे तयार केलेले आहेत. कांही दिवसांपुर्वीच या भागातील गुंजेवाडीसह इतर गांवात तुफान गारपीठ झाली होती. अनेक गावांमध्ये गारपीठ होऊन शेतींसह घरांचे अपरीमीत नुकसान झाले होते. ती घटना ताजी असतानाच पुन्हा अवकाळी पाऊस व वादळी वारे होऊन अनेकांच्या घरावरील पत्रे व संसार उपयोगी साहित्य उडुन गेले असुन कांहींच्या घराला फक्त दारे व चौकटींचेच अवशेष शिल्लक राहीले आहेत.
पांगरीतील एका शाळेच्या किचनसेडवरील पत्र्यांसह बाजारपेठ भागातील एकाच्या घरावरील पत्रे उडुन गेले आहेत. शेतक-यांच्या शेतातील गहु, हरभरा, भाजीपाला यासह ज्वारीचा कडबा पावसामुळे भिजुन मातीमोल होऊन त्याचा अगदी चिखल झाला आहे. बार्शी तालुक्याच्या पुर्व भागासह लगतच्या उस्मानाबाद जिल्हयाच्या सरहदीवरील गावात अवकाळी पावसाची व नुकसानीची मालिका सुरूच असुन अवकाळी पाऊस कांही केल्या थांबण्याचे नांवच घेताना दिसत नाही. बळीराजा त्यातुन कसेबसे मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असतानाच पुन्हा पुन्हा याच भागात वादळी वा-यासह विजेच्या गडगडाटात अवकाळी पाऊस पडत आहे. वादळी वा-यामुळे या भागातील अनेक जुने वृक्ष उलथुन पडले आहेत. शेतक-यांचे अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. पांगरी परिसरात शेतक-यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता खचला गेला असुन नेमके काय घडतयं, याचा विचार करण्याच्या पलीकडे त्याची अवस्था गेली आहे. या भागात नित्याचाच झालेल्या अवकाळी पावसामुळे कधी कधी शेतक'यांच्या डोळयात अश्रू उभे करू लागला असुन निसर्गाच्या मनात नेमक काय आहे याचा विचार आता या भागातील शेतकरी करू लागला आहे.