बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरातील विविध प्रकारच्या गुन्हेगारीसंदर्भात माहिती गस्त घालून माहिती संकलन करण्यासाठी, गुन्हेगारांच्या हालचालीवर बारीक लक्ष घालण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या बीट मार्शल च्या वाहनांची पोलिस उपअधिक्षक रोहिदास पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी वाहनांस हिरवा झेंडा दाखवून बीट मार्शलची सुरुवात करण्यात आली.
    गुरुवारी दि.१ रोजी बार्शी पोलिस ठाणे येथून बीट मार्शलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक सालार चाऊस, ठाण्यातील पोलिस कर्मचारी व विविध वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. बार्शी शहरातील लोकवस्तीनुसार चार प्रमुख भाग तयार करण्यात आले असून, कर्मचार्‍यांना त्यात्या विभागात हेरगिरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या विभागातील कर्मचार्‍यांना स्वतंत संपर्क क्रमांक, वॉकीटॉकीद्वारे सतत संपर्क साधून विविध प्रकारण्या सूचना देण्यात येत आहेत. बीट मार्शल कामी लागणारे आणखी वाहने नव्याने दाखल होणार असून चार विभागांत आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 
Top