उस्मानाबाद : तुळजापुर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने वादळी वा-याने ज्यांच्या घरावरील पत्रे उडुन गेले अशा १७ कुटुंबियाना संस्थेच्या वतीने पत्र्याचे वाटप करण्यात आले.
    यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडुकर, रोहीयोचे उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, टाटा सामाजीक विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अब्दुल शहबद, डॉ. संपत काळे, डॉ. रमेश झारे, डॉ. विपीन व्यास, विजय बनसोडे आदींची उपस्थिती होती.
    गेल्या महीन्यात जिल्ह्यामध्ये आवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडुन गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले होते. तसेच या आपत्तीवेळी अनेक जण जखमी झाले होते. त्यांना मदत म्हणुन टाटा सामाजीक विज्ञान संस्थेने केलेल्या अवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. या मदतीच्या माध्यमातुन टाटा संस्थेने आपत्तीग्रस्त कुटुंबीयाचे सर्व्‍हेक्षण करुन १७ कुटुंबीयान निवा-यासाठी पत्रे देवून मदतीचा हात पुढे केला.

 
Top