बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शीतील बाह्यवळण रस्त्यावर स्कार्पिओ अडवून सोन्याचे दागीन्यांसह दोन लाखांचा ऐवज लुटणार्या पाच संशयितांना बार्शी पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यावर न्यायदंडाधिकारी ए.एम.फडतरेे यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील एका आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहेत.
अक्षय सरकाळे (वय २२), दिपक सरकाळे (वय ४५) दोघे रा.लहूजी वस्ताद चौक,बार्शी, मंगेश सावंत (वय २२) रा.औद्योगिक वसाहत, आगळगाव रोड, दिलीप परदेशी (वय ३१) रा.कॅन्सर हॉस्पिटल जवळ, सूरज हाजगुडे (वय २६), रा.कथले प्लॉट अशी पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. दि.११ मे रोजी बार्शी बाह्यवळण रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिराजवळ स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक करुऩ चाकूचा धाक दाखवून मोबाईलसह सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत बार्शी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक डाके यांनी सांगितले.