पांगरी -: चिंचोली (ता. बार्शी) येथील सामाजीक कार्यकर्ते शंकर तात्या शिंदे यांचे हदयविकाराच्या तीव्र धक्याने बुधवारी सायंकाळी दि.14 रूग्णालयात उपचार सुरू असताना दुखःद निधन झाले. मृत्युसमयी ते सत्तर वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन नातवंडे, असा परिवार आहे. शंकर शिंदे यांच्यावर चिंचोली येथे सार्वजनिक स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वस्थरातील लोक उपस्थित होते. पुणे येथील उद्योगपती विजय शिंदे यांचे ते वडील होत.