पांगरी (गणेश गोडसे) -: पांगरी (ता. बार्शी) परिसरासह सगळीकडेच अवकाळी पावामुळे यावर्षीचा उन्हाळा जाचक व त्रासदायक ठरत नसुन याचा फटका फक्त शेतक-यांनाच बसतो असे नव्हे. उन्हाळयाच्या दिवसात ऊन पावसाच्या खेळात मात्र रसवंती चालकांसह शितपेय व्यावसायिकांना मंदीचा मोठा फटका बसला आहे. उन्हाळयात सर्वात जास्त उष्णतेचा व कडक महिना म्हणुन ओळखल्या जाणा-या मे महिना मध्यावर येऊन उन्हाळा संपन्याची वेळ येऊन सुध्दा रसवंतीगृहांना व शितपेय चालकांना ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसावे लागत आहे.
जसजसी उन्हाच्या तीव्रतेत भरीव वाढ होऊ लागते तसतसे गावोगावच्या रसवंतीगृहांना सुगिचे दिवस येतात हा आजवरचा इतिहास आहे. सर्वसामान्यांचे शितपेय अशी ओळख निर्माण झालेल्या व आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असलेल्या ऊसाच्या ताज्या रसाला सगळीकडेच विशेष मागणी असायची. ऊन्हामुळे शरिराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व शरीराला थंडावा निर्माण करण्यासाठी शीतपेयांकडे गर्दी होत असते. मात्र यावर्षी उलटी परिस्थती असुन रसवंतीगृहासह शितपेये ओस पडल्याचे दिसत आहे. शितपेय नको रे बाबा असाच कांहीस सुर जनतेमधुन पहावयास मिळत आहे.
मात्र यावर्षी या शितपेय विक्रेते व रसवंतीगृहचालकांना सततच्या अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. एरव्ही या दिवसात पै पाहुन्यांसह मित्रमंडळींना चला थंड घेऊ असे म्हणणारे नागरीक हे थंड घेण्याचे टाळुन चहाला पसंती देताना दिसत आहेत. सध्या प्रचलीत असलेल्या इतर शीतपेयांमध्ये शरीरास धोकादायक असलेल्या किटानुंसह इतर हाणीकारक रासायनिक घटक आढळल्यामुळे आबालवृदधांसह सर्वसामान्य ग्राहक ऊसाच्या ताज्या रसाला पहिली पसंती देत असत. आजच्या महागाईच्या व दरवाढीच्या काळातही इतर कंपन्यांच्या तुलनेत उसाच्या रसाचे दर मात्र अगदीच अत्यल्प असल्यानेच ग्राहकांचा जास्त ओढा हा ऊसाच्या रसाकडेच आहे. सध्या रसवंतीचालकांना स्वस्त दराने ऊस उपलब्ध होत आहे. उसाची माफक दरात उपलब्धता होत असली तरी मात्र उसाच्या रसाला ग्राहकांची मागणीच नसल्यामुळे अनेक रसवंतीचालकांचे दिवसाचे पगारही निघत नाहीत. त्यामुळे कांही रसवंती चालकांनी भर उन्हाळयाच्या मे मध्येच आपल्या रसवंती गृहांना टाळे लावुन या व्यवसायाला रामराम केला असल्याचे दिसत आहे. एरव्ही या काळात दिवसाकाठी 1000 रूपयांपर्यत नफा कमावणा-या रसवंतीचालकांना या हंगामात मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. कशाचा फटका कोणाला बसेल याचा कांही नेम नसुन ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे शितपेय विक्रेत्यांसह सर्वजण हवालदिल झाले असुन किमान मे मध्ये तरी कडक ऊन पडुन व्यवसायात वाढ होर्इल अशी आशा या व्यवसायिकांना होती. मात्र त्यांच्या नफा मिळुन तोटा भरून निघेल या आशेवर मात्र निसर्गाने विरझन टाकले आहे. यावर्षी निसर्ग समतोल ढासळल्यासारखेच करत असुन सकाळी उन्हाळा रात्री पावसाळा तर पहाटे हिवाळा अशीच कांही परिस्थती आहे .रसवंतीगृह चालकांनी ज्या अपेक्षेने रसवंतीसाठी ऊस खरेदी करून ठेवला त्याचा पश्चाताप आज चालकांना होत आहे. उन्हाळयांच्या दिवसाची चाहुल लागताच रस्ते राज्यमार्गासह गावोगावी रसवंतीगृहांची घुंगर वाजण्यास सुरूवात होते.
शितपेयांत किटकनाशक :- अलिकडील काळात विविध कंपन्यांच्या शितपेयांच्या शिलबंद बाटल्यात झुरळ, माशा, डास, मुंगळे, किडे, विषारी पाल, आळया आदी किटक आढळुन येऊ लागल्यामुळे लोकांची शितपेयांकडे पाहण्याची मानसिकताही बदलु लागली आहे. त्याचाही फटका शितपेय व्यावसायीकांना व विक्रेत्यांसह कंपन्यांना बसत असल्याचे दिसत आहे.
नियोजन कोलमडले :- चालु हंगामात रसवंतीगृह चालकांसह शितपेय विक्रेत्यांनी ठरावीक नफा होण्याची आशा धरून त्यावर आपल्यासह कुटुंबाचे आर्थिक नियोजन ठरवुन तशा पध्दतीने योजना आखल्या गेल्या होत्या. मात्र आले निसर्गाच्या मना तेथे कोणाचेच चालेना याप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणामुळे आमची आर्थिक स्वप्ने धुळीस मिळुन मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचे लग्नाचे आदी सर्वच नियोजन कोलमडल्याच्या प्रतिक्रिया अनेक विक्रेत्यांनी बोलताना व्यक्त केल्या.