सोलापूर :- महाराष्ट्र शासनातर्फे सन 2013-14 करिता लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मातंग समाजातील साहित्यिक, कलावंत, समाजसेवक व सामाजिक संस्थांना देण्यात येणार आहेत..
या पुरस्कारासाठी इचछुक व्यक्ती/ संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज भरुन त्यासोबत कार्य केल्याचे पुरावे इ. तीन प्रतीत दि. 25 मे 2014 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सात रस्ता, सुधा इडली गृहासमोर तिसरा मजला, सोलापूर यांचेकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. विहित मुदतीनंतर व विहित नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांचेकडे संपर्क साधावा असे मनिषा फुले, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी कळविले आहे.