सोलापूर :- कुस्ती या खेळात राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनिय कामगिरी केलेल्या तसेच हिंद केसरी, रुस्तमे हिंद, महान भारत केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी किताब मिळविलेल्या वयोवृध्द खेळाडूंना मानधन शासनस्तरावरुन देण्यात येते यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (आवश्यक माहितीसह) संबंधित प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, तीन प्रती छायाचित्र, पती - पत्परचे संयुक्त राष्ट्रीकृत बँकेत उघडलेल्या खात्याच्या पासबुकची झेरॉक्सप्रत इ. सह दिनांक 26 मे 2014 पर्यंत 2 प्रतीत कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे तसेच शासन स्तरावरुन वेळोवेळी मागितलेल्या कागदपत्रांची पुर्तता संबंधित खेळाडूंना करणे बंधनकारक आहे. असे सोलापूर जिल्ह्याच्याजिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी कळविले आहे.