पांगरी (गणेश गोडसे) :- छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची आज समाजाला ख-या अर्थाने गरज असुन त्यांचे विचार अवलंबात आल्यास समाज देश व लोकांची प्रगती झाल्याशिवाय रहाणार नाही, असे प्रतिपादन प्रदीप चव्हान यांनी केले. ते कारी ता.बार्शी येथे याराना गृप व बी.जे. ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संभाजी महाराजांच्या 357 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
    संभाजी महाराज जयंतीनिमित्त कारीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानानंर सायंकाळी कारी गावातुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणुक काढण्‍यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्‍यासाठी संजीत डाके, महेश चालखोर, लक्ष्मण लोहार, विकास गादेकर, दिपक डोके, खंडु हाजगुडे, रवि जाधव, दत्ता चौधरी, सचिन शिंदे, सुरज अंधारे, सागर डोके, परिक्षत विधाते, अजिंक्य गायकवाड, प्रविण डाके यांच्यासह ग्रामस्थ व मंडळांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top