बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शीतील नाट्यप्रशिक्षण शिबीराने नवीन पिढाला अभिनय क्षेत्रात पुरक वातावरण निर्माण झाले आहे, येथे नाट्य शाखेची गरज असल्‍याने त्‍यासाठी प्रयत्‍न करु, असे प्रतिपादन राज्‍य नाट्य परिषदेचे कार्यकारी सदस्‍य तथा मसापचे जिल्‍हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांनी केले.
    महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेच्‍या बार्शी शाखेने दहा दिवसांचे नाट्यप्रशिक्षण शिबीर यशस्‍वीपणे पार पाडले. शिबीराचा समारोप प्रसंगी यशस्‍वी कलाकारांना प्रमाणपत्र वितरण करताना ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर जयकुमार शितोळे, ज्‍येष्‍ठ रंगकर्मी विश्‍वासराव शेटे, बार्शी मसाप शाखाध्‍यक्ष पां.न. निपाणीकर उपस्थित होते.
    नाट्य शाखेकडूनच नाट्यक्षेत्रातील उपक्रम यापुढील काळात होतील, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्‍यक्‍त केली. बार्शीत शाखा स्‍थापनेसाठी आवश्‍यक ती मदत करु, असेही ते म्‍हणाले. जयकुमार शितोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत यापुढेही संस्‍था अशा कार्यक्रमांसाठी प्रेरणा देत नाहीत, असे सांगितले.
    प्रशिक्षक अमर देवकर, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नम्रता चौधरी, सहर्ष संघवी यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. संयोजन समितीची भूमिका सचिन वायकुळे यांनी मांडली. संयोजन समितीचे रामचंद्र इकारे, कविता अंधारे, वायकुळे यांचाही यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. दरम्‍यान, प्रशिक्षणार्थीनी केलेल्‍या सादरीकरणाही उपस्थितांनी दाद दिली. सहभागी कलाकारांचे कौतुक करुन त्‍यांना प्रमाणपत्र देण्‍यात दिले.
    प्रास्‍ताविकात नाट्यशिबीर घेण्‍यापाठीमागची भूमिका पां.न. निपाणीकर यांनी मांडली. या शिबीरासाठी शिवशक्‍ती अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी योगदान दिले. ज्‍येष्‍ठ रंगकर्मी विश्‍वासराव शेटे यांचा यावेळी विशेष सत्‍कार करण्‍यात आला.
    मुख्‍याध्‍यापिका पवार यांच्‍याकडे शाळेसाठीची पुस्‍तके आयोजकांकडून प्रदान करण्‍यात आली. नागेश अक्‍कलकोटे, वर्धमान खांडवीकर, मुख्‍याध्‍यापिका पवार यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्राचार्य चंद्रकांत मोरे, व.न. इंगळे, निवृत्‍त तहसिलदार मदनराव वायकुळे, प्रमोद पाटील, अॅड. प्रशांत शेटे, शब्‍बीर मुलाणी, प्रकाश गव्‍हाणे, दत्‍ता गोसावी उपस्थित होते. सुत्रसंचालन वसिम शेख यांनी तर कविता अंधारे यांनी आभार मानले.
 
Top