पांगरी (गणेश गोडसे) :- मेंढरांचा कळप घेऊन कारी भागात आलेल्या एका मेंढपाळ विवाहितेचा पाण्यासाठी गेल्यावर विहीरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवार दि. 15 मे रोजी सकाळी कारी (ता.बार्शी) शिवारात घडली आहे.
    शांताबाई हिंदुराव ठोंबर (वय 36, रा.तडवळे, ता.कोरेगांव, जि.सातारा) असे विहीरीत पडुन पाण्यात बुडुन मृत्युमुखी पडलेल्या विवाहीतेचे नांव आहे. शिवाजी संपत ठोंबरे (वय 45) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, ते त्यांच्यासह इतर बि-हाडांसह प्रत्येक वर्षी आपली मेंढरे जगवण्‍यासाठी कारी परिसरात येतात. गुरुवार रोजी सकाळी मयत शांताबाई हया कारी शिवारातीलच तानाजी गायकवाड यांच्या मालकीच्या गट नंबर 401 मधील खोल विहीरीत पाणी आणण्‍यासाठी गेल्या असता पाय घसरून विहीरीत पडुन त्यांचा मृत्यु झाला. विहीरीत पडलेल्या ठोंबरे यांच्या मृतदेहाचे विहीरीतील खेकडा व माशांनी लचके तोडले होते.
  मेंढरे जगवण्‍यासाठी भटकत आलेल्या मेंढपाळ महिलेचाच पाण्यासाठी विहीरीत पडुन दुदैर्वी मृत्यु झाल्यामुळे कारीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेंढरे घेऊन आलेल्या इतर बि-हाडांवर शोककळा पसरली आहे. शिवाजी ठोंबरे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मयत म्हणुन गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
 
Top