कळंब -: महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमिक शिक्षक संघाच्‍या राज्‍यस्‍तरीय पदाधिका-यांच्‍या शिष्‍टमंडळाने शिक्षक संघाचे मागदर्शक प्रा. एस.डी. पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याचे ग्रामविकास मंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन शिक्षकांच्‍या विविध प्रश्‍नावर चर्चा केली असल्‍याची माहिती संघाचे प्रदेश कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे यांनी दिली.
            दि. 13 एप्रिल रोजी यांची महाराष्‍ट्र राज्‍य प्राथमि शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्रा.एस.डी. पाटील यांच्‍या नेृत्‍वाखाली  ना. जयंत पाटीलयांची भेट घेऊन शिक्षकांच्‍या विविध महत्‍त्‍वाच्‍या प्रश्‍नावर चर्चा केली. या चर्चेत राज्‍यातील प्राथमिक शिक्षकांच्‍या प्रशासकीय बदल्‍या करण्‍यास स्‍थगिती द्यावी, जिल्‍हास्‍तरावर विनाअट आपआपसात विनंती बदल्‍या करण्‍यात याव्‍यात, अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन तालुक्‍यात करण्‍यात यावे, पदोन्‍नतीचे आदेश काढून नंतरच समायोजन करण्‍यात यावे. संगणक प्रशिक्षक पूर्ण करण्‍यासाठी डिसेंबर 2015 पर्यंत मुदतवाढ द्यावी, उत्‍कृष्‍ठ कार्य व पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षकांच्‍या वेतनवाढी पुर्ववत करण्‍यात याव्‍यात. तसेच 20 पेक्षा कमी पटसंख्‍या असणा-या शाळा बंद करण्‍यात येऊ नयेत, सातवीपर्यंत शाळेवर मुख्‍याध्‍यापक पद निर्माण करण्‍यात यावे, इयत्‍ता पाचवी व आठवी वर्ग विनाअट प्राथमिक शाळेला जोडण्‍यात त्वरीत कार्यवाही करावी,इत्‍यादी प्रश्‍न त्‍वरीत निकाली काढण्‍यात ना. पाटील यांनी ग्रामविकास विभागाचे सचिव एस.एस. संधू यांना सुचना देवून या आठवड्यात आदेश काढण्‍याचे आश्‍वासन दिले.
              यावेळी खासगी सचिव सुभाष राखे, उप‍सचिव रहाटे, शिक्षक संघाचे अध्‍यक्ष राजाराम वरुटे, कार्याध्‍यक्ष बाळकृष्‍ण तांबारे, सरचिटणीस आप्‍पासाहेब कुल, कोषाध्‍यक्ष अंबादास वाजे आदीजण उपस्थित होते.
 
 
Top