उस्मानाबाद -: शिवसेनेचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड हे उस्‍मानाबाद लोकसभा मतदार संघातून तब्‍बल 2 लाख 37 हजार 780 मतांनी विजयी झाले. तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांना पराभव पत्‍करावा लागला. डॉ. पाटील हे सहा वेळा विधानसभा व एकवेळ लोकसभा निवडणुक जिंकली होती. शिवसेनेचे प्रा. गायकवाड हे विजयी झाल्‍याने त्‍यांच्‍या समर्थकांनी सर्वत्र एकच जल्‍लोष केला.
    उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्‍या 16 वी लोकसभा निवडणुकीत एकूण २७ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. या निवडणुकीत सरासरी ६४ टक्के मतदान झाले होते. वाढलेला मतदानाचा टक्का अखेर डॉ.पद्मसिंह पाटील यांना धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत केवळ सहा हजार मतांनी पराभूत झालेले शिवसेनेचे रविंद्र गायकवाड यांनी यंदाच्या निवडणूकीत जोरदार मुसंडी मारत यंदाच्‍या निवडणुकीत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला.
    प्रा. गायकवाड यांना विधानसभा मतदार संघातून पुढीलप्रमाणे मतदार मिळाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे.
उमरगा -  39871
तुळजापूर - 34000
उस्‍मानाबाद - 20000
औसा - 54000
बार्शी - 53985
भूम - 25149
 
Top