बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या विजयासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत हे अप्रत्यक्षपणे व त्यांचे कार्यकर्ते प्रत्यक्षपणे, यापूर्वीचे काही काळ राष्ट्रवादीचे तर सध्याचे शिवसेनेचे राजेंद्र मिरगणे, नोकरीला लाथ मारुन शिवसेनेत प्रवेश केलेले भाऊसाहेब आंधळकर यासह जुने व नवीन शिवसैनिक तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे जीव तोडून प्रचार केल्याने मतदार संघाबरोबरच बार्शीतून मोठ्या मताधिक्याने प्रा. रविंद्र गायकवाड यांचा विजय झाला आहे. प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या विजयाची घोषणा झाल्याबरोबरच बार्शीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बार्शी शहर व तालुक्यातील शिवसेना, भाजपा, आरपीआय सह युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन एकच जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे व मिठाई वाटून आनंद द्विगुणित केला. फटाक्यांची आतषबाजी करत गटा तटाने कार्यकर्ते घोषणाबाजी करत फिरत असल्याचे दिसत होते. कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व प्रमुख चौकांतून फटाके, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला व सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. राजेंद्र मिरगणे यांनी मुठभर कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन शहरातून फेरी काढून शहरातील व्यापार्यांना गुलाब पुष्प व बुंदीचे लाडू वाटप केले. यानंतर भगवंत मंदिरात जाऊन दर्शन घेतले. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केल्याने बार्शी शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. राऊत या प्रसंगी बोलतांना म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधात जनतेचा मोठा सूर होता, चांगले चांगले दिग्गज देखिल या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. सर्वसाङ्कान्यांचे प्रश्न आणि सातत्याने त्याबाबत होत असलेल्या भाजपाच्या प्रचाराने जनतेच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला होता त्याचा परिणाङ्क संपूर्ण देशात दिसून आला आहे.