पांगरी (गणेश गोडसे) :- मोदी फिवरचा करिष्मा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात चालुन शिवसेना-भाजपा युतीचे रविंद्र गायकवाड हे एक लाख दहा हजार मताधिक्याने विजयी झाल्याच्या वृत्ताने पांगरी (ता. बार्शी) विभागात सेना-भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत व पेठे वाटुन आनंदोत्सव साजरा केला. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा निकाल बाहेर आल्यानंतर व युतीचे उमेदवार रविंद्र गायकवाड यांनी आठ हजार मतांच्याही पुढे आघाडी घेतल्यामुळे बार्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बेभान होऊन आनंदोत्सवास सुरूवात केली.
पहिल्या फेरीत गायकवाड यांनी मताधिक्य घेण्यास केलेली सुरूवात शेवटच्या टप्यापर्यंत कायम राहीली. बस स्थानक शिवाजी चौक, अचानक चौक, श्रीरामपेठ, बाजारपेठ, आदी भागात कार्यकर्ते फटाके आदल्या फोडत होते. चौकाचौकात व मिळेल तेथे टिव्हीवरील माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. व्हॉटस अॅप, फेसबुक, संदेश आदींसह भ्रमणध्वनीवर एकमेकांना मताधिक्याबाबत माहिती दिली जात होती. तरूण एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत होते. यावेळेस संपुर्ण देशासह उस्मानाबाद मतदारसंघात मोदी फॅक्टर चांगलाच यश्स्वी ठरला आहे. महिला व तरूणींनाही यावेळेस निकालाची उत्सुकता लागली होती. सकाळपासुनच स्त्री-पुरूषांसह तरूण-तरूणी वृत्तवाहिन्यांसमोर बसुन असल्याचे दिसत होते.
मतदान प्रकिया पार पडल्यानंतर अनेकांचे डोळे निकालाकडे लागले होते. उस्मानाबाद मतदारसंघाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. गतवेळेस गायकवाड हे अल्पशा मतांनी पराजित झाल्यामुळे कार्यकर्ते यावेळेस जिद्दीने प्रचारात उतरून निवडुन येण्यासाठी प्रयत्न केला होता. सकाळी निकालाला सुरूवात झाल्यानंतर पांगरीसह कारी, चिंचोली, पांढरी, उक्कडगांव, घारी, पुरी, गोरमाळे, नारी, चिखर्डे, घोळवेवाडी, पाथरी, शिराळे, कुसळंब, टोणेवाडी, ढेंबरेवाडी, जामगांव, आगळगांव, आरणगांव आदी पांगरी परिसरातील गावातील युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन व एकमेकांना पेठे भरवुन मुक्तहस्ते गुलालाची उधळण करत विजयाचा आनंद साजरा केला. पांगरी बसस्थानक परिसरात पांगरीचे शिवसेना विभागप्रमुख डॉ.विलास लाडे, शाखा प्रमुख रमेश मुळे, विष्णु घोडके, राजाभाऊ पाटील, पांढरीत तात्या घावटे, कुंडलीक घावटे, आदी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवात सहभाग घेतला होता.