नळदुर्ग -: भिमाशंकर हासुरे ही व्यक्ती केवळ जळकोटचीच भुषण नाही तर उस्मानाबाद जिल्हयाची आहे. हासुरे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला चांगला समाजसेवक मिळाल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
जळकोट येथील शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी आयोजीत भाजपाचे जिल्हा सरसिटणीस भिमाशंकर हासुरे यांच्या वतीने गावात लग्न समारंभ, सामाजिक व धार्मिक कार्यासाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा योजनेच्या उद्यघाटनपर भाषणत ठाकूर हे बोलत होते. अध्यक्षस्थानी तुळजाभवानी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील हे होते.
यावेळी बोलताना ठाकूर म्हणले की, माणस पक्षामध्ये स्वतासाठी येत असतात. परंतु हासुरे यांनी आतापर्यंत स्वतासाठी काहीही मागितले नाही. समाजकार्यासाठी तळमळ असणारी यार व्यक्तीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही ठाकूर यांनी दिली. यावेळी भिमाशंकर हासुरे म्हणाले की, पुस्तक व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्टाच्या कानाकोप-यात पोहंचलो असलो तरी जळकोट गावासाठी भविष्यात चांगले सामाजिक कार्य जेष्ठांचे मार्गदर्शन घेवून असेच चालू ठेवणार आहे. गेल्यावषार्गच्या दुष्काळात मोफत पाणी पुरवठा दिला त्यातूनच मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमात प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्याक्ष दत्ता कुलकर्णी,जिल्हा सरचिटणीस अॅड. अनिल काळे, व दुसरे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, तालुका अध्यक्ष विजय शिंगाडे, माजी तालुका अध्यक्ष, मनसे जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे, शिवसेना तालुका उपप्रमुख कष्णात मारे,ऋषीसंशोधक शिवाजीराव कदम, प्रा. गजेंद्र कदम-पाटील, विकास चुंगे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज स्वामी, अनिल छत्रे, गोविंद चुंगे, शाबूद्दीन शेख, रेवण दरेकर, बसवराज माळगे, गुंडाप्पा कुंभार,दत्ता राजमाने, लक्ष्मण डोंगरे, म्हलारी लोखंडे, विजय यादगौडा, सतीश माळी, आदीजन उपस्थित होते. टी.व्ही. स्टार विलास कुलकर्णी यांचा गितगायनाचा कार्यक्रम प्रारंभी पार पाडला. सुत्रसंचालक व आभार प्रदर्शन अशोक सुरवसे यांनी केले.