पांगरी (गणेश गोडसे) -: नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी भरधाव वेगात निघालेल्या तवेरा गाडीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या पादचा-यास जोरदार धडक दिल्यानंतर गाडीने चार पलटया खाल्यामुळे झालेल्या अपघातात मुंबई येथील नऊ जणांह दहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवार रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-लातुर राज्यमार्गावर ढेंबरेवाडी गावातील गतिरोधकावर घडली. जखमींमध्ये एका सहा महिन्यांच्या लहान बालकाचा समावेश आहे.
किरण भगवान मुंढे (वय 28, रा.ढेंबरेवाडी, ता.बार्शी), सुधाकर शुभाष तिलमिलदार (वय 30), आशा राजु जाधव (वय 30), आदित्य सुधाकर तिलमीलदार (वय 6 महिने), नंदीनी सुधाकर तिलमिलदार (वय 5 वर्ष), अंगद रामु जाधव (वय 5 वर्ष), स्वाती राजु जाधव (15 वर्ष), रोशन राजु जाधव (वय 6 वर्ष), अनुसया सुधाकर तिलमिलदार (वय 18), आशा गंगाधर नेलेगी (वय 18 वर्ष) व संदिप अंगद केंद्रे (वय 28, सर्व रा.मुंबई) अशी अपघातात गंभिर जखमी झालेल्यांची नांवे असुन त्यांच्यावर पांगरीच्या ग्रामिण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना बार्शीच्या जगदाळेमामा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन जखमीपैकी तिघांची प्रकृती चितांजनक आहे.
जखमी किरण भगवान मुंढे (रा. ढेंबरेवाडी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, ते आज शनिवारी दि. 9 मे रोजी सकाळी प्रांतविधीला जाण्यासाठी थांबले असता पांगरीहुन येडशीकडे भरधाव वेगात निघालेल्या एम.एच.03ए.एम.7129 या तवेरा कंपनीच्या गाडीच्या चालकाचा ढेंबरेवाडी गावातील गतिरोधकावर ताबा सुटला. नंतर त्या तवेराचालकाने मुंढे यांना जोरदार धडक दिली. गाडी गतिरोधकावर आदळल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे गाडी पलटया खात जि.प.प्रशालेल्या गेटवर जावुन आदळली. अपघातात गाडीचे एक लाखाचे नुकसान झाले आहे.
जखमी हे मुंबईहुन उदगीर येथे नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी जात होते. आपल्या ताब्यातील तवेरा वाहन हयगयीने अविचाराने व परिस्थतरीचा अंदाज न घेता चालवु गाडीमधील प्रवाशांना जखमी करण्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी चालक केंद्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य ग्रामिण अभियानाअंतर्गत राबण्यात येत असलेल्या बि.व्ही.जी.आपत्कालीन सेवेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सेवेमुळे पांगरी येथील रूग्णवाहिकेने अवघ्या कांही मिनिटात तात्काळ अपघातस्थळावर धाव घेऊन जखमींना गाडीतुन बाहेर काढुन पांगरी ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. त्यामुळे जखमींना तात्काळ उपचार मिळु शकले.