पांगरी (गणेश गोडसे) :- श्‍वसनाच्या त्रासाने एका 70 वर्षी बालब्रम्हचारी महाराजांचा मृत्यु झाल्याची घटना बावी आगलावी (ता. बार्शी) येथे घडली. माधवानंद रामानंद सरस्वती (वय 70, रा.बावी) असे श्‍वसनाचा त्रास झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या महाराजांचे नांव आहे.
    बार्शी ग्रामीण रूग्णालयाचे वैदयकिय अधिका-यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, बावी येथील माधवानंद सरस्वती यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रूग्णालयात मृत्यु झाला. वैद्यकीय अधिका-यांच्या खबरीवरून पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणुन गुन्हा दाखल करण्‍यात आला असुन अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top