पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान पकडलेली 12 लाख रूपये किंमतीची विदेशी दारू ही जलंब (ता.शेगांव जि.बुलढाणा) पोलिस ठाण्याच्या हदीत 11 मे रोजीच्या रात्री झालेल्याचोरीप्रकरणातील असल्याचे उघड झाले आहे. आरोपी ही चोरीची दारू विक्रिच्या उदेशाने बार्शीकडे घेऊन जात होते. जलंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एम.माकोडे यांच्या पथकाने पांगरीत येऊन जप्त करण्‍यात आलेल्या दारूच्या साठयाची पहाणी केली. आलेल्या पथकाने त्यांच्याकडे दाखल असलेल्या विदेशीदारू चोरीच्या गुन्हयातील बॅच नंबरची व पांगरी पोलिसांनी पकडलेल्या दारूच्या बाटल्यावरील बॅच नंबरची खातरजमा करून सदर माल जलंब येथील चोरीप्रकरणातीलच असल्याचा निषकर्श काढुन ते अटक करण्‍यात आलेल्या आरोपींसह जलंबकडे रवाना झाले.. अनिल पवार, भारत पवार, संगिता चव्हाण, सुनिता शिंगणे यांना ताब्यात घेण्‍यात आले होते.
    सोमवारी पहाटे नाकाबंदीदरम्यान व रात्रगस्त सुरू असताना उस्मानाबाद-सोलापुर जिल्हयाच्या सिमेवरील काटेगांवजवळील धामनगांव (ता. बार्शी) येथील घाटात पोलिसांनी संशायास्पद रित्या जाणा-या टेम्पोची तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचा मोठा साठा संशयास्पद आढळुन आला होता. वाहनाची तपासणी सुरू असताना दोनजण अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेल्यामुळे पोलिसांना टेम्पोतील दारूचा साठा हा चोरीतीलच असल्याची खात्री झाल्यामुळे त्यांनी दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेतले होते. उडवाउडवीच्या उत्तरामुळे पोलिसांनी टेम्पो पांगरी पोलिस ठाण्यात आणुन जप्त केला होता. विदेशी कंपनीच्या 12 लाख रूपयांच्या दारूसह आठ लाख रूपये किंमतीचा टेम्पो असा 20 लाखाचा मुदेमाल पांगरी पोलिसांनी जप्त करून तसी नोंद घेतली होती. पकडण्‍यात आलेल्या दारूसंदर्भात माहिती इतर पोलिस ठाण्यांना कळवल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क होऊन जालना पोलिसांना या दारूबाबत अंदाज आला होता.
 
Top