सोलापूर :- पंढरपूर आषाढी वारीचे व्यवस्थापन हे जिल्ह्यातील प्रशासनाचे महत्वाचे काम आहे. यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करुन आराखडा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती श्वेता सिंघल, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले की, पोलीस व पंढरपूर नगरपरिषदेची महत्वाची जबाबदारी आहे नगरपरिषदेसाठी, अतिक्रमणे काढणे, कचरा व्यवस्थापन, रस्ते व्यवस्था, शौचालय व्यवस्था, स्वच्छता आदि विविध कामांसाठी स्वतंत्र अधिका-यांची नेमणुक करावी. कोणत्या ठिकाणी कोणावर दिवसनिहाय काय जबाबदारी देण्यात आली आहे त्या अधिका-याचे नांव, भ्रमणध्वनी क्रमांकासह आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच धोकादायक इमारतीबाबत नाटीस देवून आवश्यक कार्यवाही करावी. तर पोलीस विभागाने चोख पोलीस बंदोबस्त, दक्षता पथक आदिंबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे, पालखी मार्गावरील रस्ते सुस्थितीत ठेवणे, पालखी तळाची पाहणी करुन मजबुतीकरणासाठी प्रस्ताव देण्यात यावा. आरोग्य विभागाने कोठे - कोठे आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आली आहे. त्याठिकाणी 24 तास कार्यरत असले पाहिजे दिवसनिहाय कोणत्यावेळी कोण तेथे उपस्थित राहतील त्यांची नांवे व भ्रमणध्वनी क्रमांकासह माहिती द्यावी. किती वैद्यकीय अधिकारी आवश्यक आहेत त्याचीही मागणी देण्यात यावी. औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्धतेबाबतही चर्चा करुन मार्गदर्शन केले. तसेच अन्न व औषध प्रशासनाने नमूना तपासणीसाठी अधिकारी/ कर्मचारी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असले पाहिजेत यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी केल्या.
तसेच महावितरणने विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, अनाधिकृत कनेक्शनमुळे काही दुर्घटना होवू नये याची दक्षता घ्यावी. विद्युत पुरवठ्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास कोणत्या ठिकाणी कोण अधिकारी कर्मचारी उपलब्ध असणार आहेत त्याची नांवे व भ्रमणध्वनीसह यादी देण्यात यावी, असेही संबंधित अधिका-यांना बैठकीत सूचीत करण्यात आले.
या बैठकीत बसस्थानके व त्याअनुषंगाने व्यवस्था, जादा बसेसची व्यवस्था करणे, पंढरपूर, माळशिरस तालुक्यात केरोसीन, गॅसचे वितरण करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, अग्निशमन दलाची वाहनाची व्यवस्था करणे व या वाहनासाठी ठिकाणे निश्चित करणे, जि.प. हद्दीत अतिक्रमण काढणे, स्वच्छता राखणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आदिबाबत सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच प्रमुख विभागाच्या अधिका-यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष सुरु करण्याचे ठरविण्यात आले.