बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील वीरशैव लिंगायत तेली समाजसेवी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दुसर्‍या राज्यव्यापी सामुदायिक विवाह सोहळ्यात ४ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी २१५ उपवर वधू वरांचा परिचय मेळावा घेण्यात आला. रविवारी दि.११ रोजी कृषि उत्पन्ना बाजार समितीच्या सेलहॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री दिलीप सोपल, श्रीगुरु रेवणसिध्द परंडकर महाराज, सिध्देश्वरलिंग गडगेकर महाराज, प्रभुदेव माढेकर महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
     या कार्यक्रमासाठी नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव (उस्मानाबाद), सांगली,सातारा, कोल्हापूर, पुणे आदी विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. यावेळी जीवनज्योत संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर, चि. गंधर्व साळुंखे (वय १०) यांचे स्त्रीभृणहत्या विरोधात व्याख्यान, कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष राजाभाऊ कचरे, नागजी नान्नजकर, भिमराव कोरे, अशोक नान्नजकर, किशोर दळवी, दत्तात्रय देशमानो, दत्तात्रय चाबुकस्वार, बाळासाहेब गाताडे, बसवेश्वर बागल, महेश देशमाने, भगवान क्षीरसागर, युवा ग्रुपचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. पवार, अनिल क्षीरसागर, सोमेश्वर देशमानो यांनी सूत्रसंचलन केले.
 
Top