![]() |
प्रा. मनोहर पाटील |
पांगरी (गणेश गोडसे) :- जयपुर विद्यापीठ राजस्थान येथे जुन 2014 मध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय चर्चासाठी पांगरी (ता. बार्शी) येथील प्रा. मनोहर पाटील यांच्या शोधनिबंधाची निवड झाली आहे. दि. 8 व दि. 9 जून रोजी होणा-या चर्चासत्रात सोलापुर व उस्मानाबाद या दोन जिल्हयातुन माहिती तंत्रज्ञान व सुरक्षा या विषयावर प्रा. पाटील यांच्या एकमेव शोधनिबंधाला परवानगी मिळाली आहे. त्यांच्या शोधनिबंधाला मॅनेजमेंट टॅक्नॉलॉजी अॅन्ड इंजिनिअरींग विभागातुन गुप्त कोड मिळाला आहे.
या चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ तज्ञ मार्गदर्शक सहभागी होणार असुन प्रा. पाटील हे त्यांच्यासमोर आपला शोधनिबंध सादर करणार आहेत. पाटील यांचे यापुर्वी सात वेळा राष्ट्रीय स्तरावर व तीन वेळा आंतराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर झालेले आहेत. मात्र राज्याबाहेर पार पडणा-या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चर्चासत्रात शोधनिबंध सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक समितीचे विवेकानंद जगदाळे, प्राचार्य एस.बी.जगदाळे, प्राचार्य डॉ.एस.के.पाटील, प्राचार्य अजित मासलेकर, प्रा.मनोहर कवडे, प्रा.बाळासाहेब लांडे, प्रा.उत्तेश देशमुख, किरण गाढवे, पांगरीचे तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, किरण घावटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.