पांगरी (गणेश गोडसे) :- टँकर चुकीच्या दिशेने चालवुन दुचाकीस्वारास गंभिर जखमी केल्याची घटना पुणे-लातुर राज्यमार्गावर जामगांव (आ) ता. बार्शी येथील कुसळंब-जामगांव दरम्यानच्या जाजु पेट्रोल पंपासमोर घडली.
    कुमार माणिक गायकवाड (वय 32, रा. परतापुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे अपघातात गंभी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव असुन त्याच्यावर बार्शीच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण रामदास जोगदंड (रा. वडजी ता. वाशी) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. जोगदंड यांनी फिर्यादित म्हटले आहे की, जखमी हे परतापुरहुन कुसळंब मार्गे बार्शीकडे आपली दुचाकी क्रमांक एम.एच.13एक्यु 1666 वरून बार्शीकडे जात असताना बार्शीहुन लातुरच्या दिशेने निघालेल्या टॅकर क्रमांक एम.एच.10झेड 1076 चे चालक भानुदास भिवा शिंदे (वय 40, रा. बार्शी) यांनी सदर टँकर चुकीच्या दिशेने चालवुन दुचाकीस्वारास समोरून जोरदार धडक दिली. अपघातात टँकरसह दुचाकीचेही नुकसान झाले आहे. पांगरी पोलिसात चुकीच्या दिशेने वाहन चालवुन अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top