पांगरी (गणेश गोडसे) :- कुसळंब (ता. बार्शी) परिसरात बोरबागांच्या खरड छाटनीची कामे जोरात सुरू आहेत. बोरबागायतदार हे सध्या आपल्या आपल्या शेतातील बोरांच्या बागेमध्ये मोठया कात्रीच्या साहय्याने बोर बागांच्या गतवर्षीच्या बोरे लागुन गेलेल्या फांद्या छाटुन काढु लागले आहेत. मात्र या भागात यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे बोर उत्पादक शेतकरीही चांगलेच धास्तावलेले असुन यावर्षीचा बोरांचा हंगाम साथ देणार का असा प्रश्न येथील बोर उत्पादकांसमोर उभा राहीलेला आहे.
कुसळंबसह परिसरातील अनेक गांवात अलीकडील काळात चमेली, कडाका आदी बोर बागांचे क्षेत्र वाढलेले आहे. यावर्षी कधी नव्हे ते कुसळंब येथील बोर उत्पादक शेतक.यांच्या इतिहासात बोरबागांनी अनपेक्षित पध्दतीने साथ देऊन येथील बोर उत्पादक शेतक-यांच्या शेतीचे सोने केले होते. बोर उत्पादक शेतक-यांनी बोरांच्या विक्रीतुन लाखो रूपयांचे भरघोष उत्पादन मिळवले होते. गतवर्षी अत्यल्प पाऊस असुनही बोर उत्पादकांनी टँकरने बोरा बागांना पाणी देऊन बागा जगवुन त्यातुन भरघोस नफा मिळवला होता. त्यामुळे कुसळंबसह परिसरातील उत्पादकांमधुन समाधान व्यक्त केले होते.
मात्र मार्च महिन्यांपासुन या भागात अधुनमधुन अवकाळी पाऊस पडत असुन त्यामुळे बोरांची छाटनी करण्याच्या अगोदरच बागांना नवती फुटु लागली असुन असा प्रकार बोर उत्पादकांच्या दष्टीने हानीकारक असा आहे. कारण बोर छाटनीच्या अगोदरच बोरबागांना नवती फुटुन त्यातुन गर्भधारणा झालेल्या फांदया नंतर छाटन्यात आल्यास त्याचा बोर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. तसेच बोरांच्या बागांना उन्हाळयात जास्त पाणी मिळाल्यास बोरांमध्ये गोडी उतरण्यात कमतरता राहु शकते, असे कांही ऊत्पादक शेतक-यांचे म्हणणे आहे. बोरांना गोडी निर्माण न झाल्यास त्यांची मागणी घटुन परिणामी दर गडगडुन बोर उत्पादकांच्या आशेवर विरझन पडण्याची शक्यताही काही जानकारामधुन व्यक्त केली जात आहे.
परिसरारात उजाड माळरानावर व हलक्या प्रतीच्या जमिनीवर शेकडो एकर क्षेत्रावर बोर बागायतीची फायदयाची शेती येथील शेतक-यांकडुन केली जाते. सध्या बागांची छाटनीची कामे जोमात सुरू आहेत. मे महिन्यात साधारणत: बागांची छाटनी केली जाते. छाटनीनंतर कांही दिवसातच बागांना नवती फुटुन नविन फांद़या गर्भधारनेसह बाहेर पडतात. नंतर फक्त अधुन मधुन फक्त भुरी प्रतिबंधक फवारणी करावी लागते.