उस्मानाबाद -: स्टेट बँक ऑफ इंडियामधून 1 लाख 60 हजार रुपये काढून बसस्थानकामध्ये गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्याजवळील पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवार दि. 20 मे रोजी दुपारी उस्मानाबाद बसस्थानकावर घडली.
प्रकाश गुळवे (वय 61, रा. खामसवाडी, ता. कळंब) असे सेवानिवृत्त कर्मचा-याचे नाव आहे. यातील प्रकाश गुळवे यांनी मंगळवार रोजी उस्मानाबादच्या स्टेट बँक ऑफ इंडियामधून 1 लाख 60 हजार रुपये काढले. हे पैसे बॅगेत घेऊन गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आले असता त्यांच्या मानेवर अज्ञातांनी रसायन टाकले. याचा त्रास होऊ लागल्यामुळे गुळवे पाण्याच्या टाकीकडे गेले. यावेळी चोरट्यांनी टाकीजवळ पैसे टाकले होते. हे पैसे घेण्यासाठी गुळवे यांनी स्वत:जवळील बॅग टाकीवर ठेवली. यावेळी चोरट्यांनी डाव साधत त्यांची बॅग पळवून नेली. हा प्रकार लक्षात येताच चोरट्यांचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी गुळवे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.