जळकोट (संजय रेणुके) :- तुळजापूर तालुक्‍यातील तळकोट येथील प्राथमिक आरेग्‍य केंद्रात दि. 21 मे 2014 रोजी सकाळी 11 वाजता वैद्यकीय अधिकारी स्‍नेहा पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली मातृत्‍व संवर्धन दिन साजरा करण्‍यात आला.
   याप्रसंगी डॉ. स्‍नेहा पाटील यांनी उपसिथत गरोदर महिलांची तपासणी करून सर्व गरोदर महिलांनी आहार, विश्रांती, लसीकरन इत्‍यादीविषयी मार्गदर्शन केले. तसेच ए.एन. सी. क्लिनिक म्‍हणजे गरोदर महिला तपासणी व लसीकरन विषयी माहिती सांगितली. प्राथमिक आरेग्‍य केंद्रातील आरेग्‍य सेविका श्रीमती धरणे एस. पी. यांनी लसीकरणाविषयी सविस्‍तर माहिती सांगून ए. एन. सी चे नोंदनी करून कार्ड तयार करून दिले. तसेच अरोग्‍य सेविका श्रीमती माळी टी.के. यांनी सर्व गरोदर महिलांची एच.बी., बी.पी. युरिन टेस्‍ट वजन उंची आदींची तपासणी करून औषधे देऊन लसीकरण केले. विशेष म्‍हणजे सर्वच गरोदर महिलोची एच. आय. व्‍ही. तपासणी केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी स्‍नेहा पाटील आरोग्‍य सेविका श्रीमती धरणे एच. पी. श्रीमती माळी, टी. के गटप्रर्वर्तक सौ. कदम बी. डी., आशा कार्यकर्ती सौ. रेणुका संगाप्‍पा सांकोळे, सौ. वैशाली गणेश कदम, सौ. वनमाला सुनिल सुरवसे आदींनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी परिश्रम घेतले
 
Top