सोलापूर :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 20.05.2014 रोजी पुणे पदवीधर /शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2014 कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागु झाली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.
या निवडणूकीचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. दि. 27 मे 2014 रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दि. 3 जुन 2014 पर्यंत दाखल करता येतील. दि. 04 जून 2014 रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज दि. 06 जून 2014 रोजीपर्यंत माघार घेता येतील. दि. 20 जून रोजी सकाळी आठ ते चार या वेळात मतदान होणार असून दि. 24 जून 2014 रोजी मतमोजणी होणार आहे.