बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे धाराशिव मतदार संघासह अठरा उमेवदार विजयी झाले आहेत त्याचा मनोमन आनंद होत आहे. शिवसैनिकांनी मोठ्या जिद्दीने हे यश खेचून आणले असल्याने येत्या १ तारखेस मुंबईत जल्लोषाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांनी दिली.
बुधवारी दि.२१ रोजी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी धाराशिव मतदार संघातील प्रमुखांची बातचित करतांना ते बोलत होते. यावेळी नूतन खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, सोलापूर जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, महिला आघाडी प्रमुख अस्मिताताई गायकवाड, जिल्हा उपप्रमुख श्रावणतात्या भँवर, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, बाबासाहेब कापसे, तालुका प्रमुख काका गायकवाड, नागजीभाऊ नान्नजकर, ता.उ.प्र. सुरेश उर्फ देवा दिंडोरे, उ.वि.प्र. अमोल जाधव, पांडूरंग गपाट, दत्ता चिवटे, राजाभाऊ पाटील, रमेश मुळे, मालोजी देशमुख आदी उपस्थित होते.