बार्शी : आरएसएम समाजसेवा संस्थाध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. 
     यामध्ये तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर येथील देवस्थान आदी नजीकच्या धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. राजेंद्र मिरगणे यांच्या वाढदिनादिवशीच त्यांच्या हस्ते बसेसची पूजा करुन या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी शिरिष घळके, नानासाहेब कदम, टिंकू गव्हाणे, बिभिषण पाटील, सुनिल चौगुले, अविनाश पोकळे, दत्ता जाधव, किरण गायकवाड, मंगेश कारंडे, डॉ. विलास लाडे, धीरज पाटील, अविनाश शिंदे, संभाजी आगलावे, बाळासाहेब पवार, अजय दराड आदी उपस्थित होते.   
 
Top