पांगरी (गणेश गोडसे) -: अवकाळी पाऊस व गारपीठ होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटुन जाऊ लागला असला तरीही अद्याप 90 टक्के नुकसानग्रस्त शेतकरी हे शासकीय मदतीच्या अनुदानापासुन वंचित असुन शेतक-यांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन लोकसभा निवडणुका संपल्या किमान विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तरी नुकसानभरपाई द्या, असा आर्त टाहो बार्शी तालुक्यातील शेतकरी फोडत आहेत. मात्र त्यांचा आवाज बहि-या व मुक्या प्रशासनापर्यंत पोहोचनार का? अशी शंकाही व्यक्त होत आहे.
फेबुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपीठीचे अनुदान वाटपाचे कामाची प्रकिया असुन सुरूच असुन नुकसानग्रस्त अनेक शेतक-यांची नावे यादीतुनच गायब असल्याची धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या असुन वगळण्यात आलेल्या शेतक-यांमधुन प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन याची दखल घेऊन वरीष्ठांनी वंचित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवुन देण्यासाठी तात्काळ सकारात्मक कार्यवाही होणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरी ता.बार्शी परिसरासह बार्शी तालुक्यात 25 मार्चच्या दरम्यान तुफान अवकाळी गारपीठ व पाऊस होऊन द्राक्ष बागायतदारांसह शेतकरी व सर्वसामान्यांचे अपरिमित नुकसान झाले होते. मार्चमध्ये सुरू झालेली अवकाळी पावसाची मालिका पावसाळा सुरू होण्यास कांही दिवसाचा कालावधी राहीलेला असताना अजुनही थोडयाफार प्रमाणात टिकुन आहे. मार्च महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या व गारपीठीचे प्रशासनाने पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर केला होता. तीन महिन्यानंतर त्या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारी नुकसानीच्या अनुदानाचे वाटप विविध बँकेत करण्यास सुरूवातही झाली आहे. प्रथमतः कांही अल्पभुधारक शेतक-यांनी खात्यावर जमा झालेले अनुदान उचलुन कारणीही लावले आहे. मात्र बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावातील असंख्य शेतकरी या अनुदानाच्या यादीतच नसल्याचे उघडकीस येत आहे. पांगरीसह कारी, पांढरी, झानपुर, ममदापुर, गोरमाळे, घोळवेवाडी, ढेंबरेवाडी, उक्कडगांव, शिराळे, पाथरी, चारे, धानोरे, आगळगांव आदी अनेक गावातील हजारो शेतकरी शासनाच्या गारपीठीच्या अनुदानापासुन वंचित राहीले आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासुन वंचित राहील्यामुळे विविध संघटनाही या प्रश्नावर आवाज उठवुन प्रशासनाला जागे करू लागल्या आहेत. मात्र डोळयावर पटी बांधलेल्या प्रशासनाला या शेतक-यांच्या प्रश्नाची जाणीव होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ प्रशासन व शासनाने नुकसानग्रस्त कोणीही अनुदानापासुन वंचित रहाणार नाही याची काळजी घेचे आदेश दिले होते.ण्या मात्र त्यांच्या आदेशाला स्थानिक प्रशासनाने हरताळ पुसला असल्याचेच उघड होत आहे.
शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासनाकडे पैसैच शिल्लक नसल्याचे कारण पुढे केले जाऊ लागले असुन इतर ठिकाणी कोटयावधी रूपयांची उधळपटी करणा-या शासन-प्रशासनाकडे शेतक-यांना अनुदानापोटी देसाठीच पैसै नाहीत का? असा प्रश्न शेतक-यांमधुन विचारला जात आहे. आधिच निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस अधोगतीकडे वाटचाल करत असलेल्या शेतक-याला कोण तारणार? हाच एक मोठा विषय आहे.
पुढा-यांच्या नुसत्या गप्पाचः
दहा दिवसात, पंधरा दिवसात अनुदान शेतक-यांना वाटप करू, अशा वल्गणा मोठमोठे पुढारी मोठमोठयाने करताना दिसतात. मात्र कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न वंचित शेतकयांना पडला आहे. कांही शेतक-यांची नावांची यादी बँकाकडे आली असुन पैसै मात्र न आल्यामुळे बँका संबंधीत याद्यांची प्रत बँकेबाहेर न लावत अजुन यादीच आली नसल्याचे सांगुन शेतक-यांना बँकेतुन पिटाळुन लावत आहेत. शेतकरीही मुकाटपणे बँकेतुन बाहेर पडत नशिबाला दोष देत बसत आहे. शेतकयांनी नुकसान भरपाईच्या अनुदानासाठी बँकेत अजुन किती महिने हेलपाटे घालायचे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत कोणीही शासकीय अधिकारी अथवा प्रशासन बँक अनुदान कधी मिळेल याबाबत ठोस कांही सांगण्यास तयार नाही. शेतक-यांना अजुन किती दिवस गारपीठीच्या नुकसानभरपाईसाठी थांबावे लागणार, याचा सुगावा अद्याप नसुन अनुदान मिळणार का? असा प्रश्न कांही शेतकरी निर्माण करू लागले आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे येणा-या प्रशासकीय अडचणी लक्षात घेतल्या तरी आता तशी कांही अडचन राहीलेली नसुन तात्काळ उर्वरीत शेतक-यांना अवकाळी नुकसानभरपाई वाटप करावी, अशी शेतक-यांची मागणी आहे.