कळंब -: भोंदुगिरी बुवाबाजी करुन सर्वसामान्य जनतेस लुबाडणा-या भोंदुबाबा एकनाथ लोमट यास तात्काळ अटक करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्यावतीने आज शुक्रवार दि. 23 मे रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी कळंब तहसिलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे हा भोंदुबाबा ब-याच दिवसांपासून असाध्य रोग व जुगाट रोगावर खात्रीशिर उपचार म्हणून जडीबुटी, बुक्का, लिंबू, नारळव, मिरची अशाव इतर जडी बुट्या देवून स्वतःचा फोटो, पुस्तक देवून त्या बद्दल पैसे घेऊन अनेक भोळ्या भाबाड्या, गोरगरीब जनतेकडूनप्रगचंड प्रमाणात पैसे उखळत आहे, अशा आश्रयाचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीने उस्मानाबाद जिल्हाधिका-यांना देवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. या मागणीची जिल्हाधिका-यांनी दखल घेवून भोंदुबाबाची चौकशी करण्यासाठी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. दि. 21 मार्च2014 पर्यंत कार्यवाहीची अपेक्षित तारीख व बैठक घेण्याचे सांगितले होते. मात्र दोन महिन्याचा कालावधीत उलटत आला तरी अद्यापर्यंत कसलीही कारवाई करण्यात आली नाही.
भोंदुबाबायास तात्काळ अटक करुन कार्यवाही करावी, जिल्हाधिका-यांनी एकनाथ महाराज यांच्या भोंदुगिरीबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश करुन निवृत्त न्यायाधीशाच्या नियंत्रणाखाली कामकाज करावे, एकनाथ लोमटे यांच्यावर आधारीत मलकापूचा महीमा व अन्य पुस्तके, कॅसेटवर बंदी घालावी या मागणीसाठी शुक्रवार रोजी भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
वरील मागण्या तात्काळ मान्य करुन भोंदुबाबास तात्काळ अटक रुन पुढील कार्यवाही करावी अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीकडून भोंदुबाबा याच्यावर कार्यवाही होण्यासाठी यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, तरी याची गंभीर दखल घेवुन भोंदुबाबास अटक करावी, अशी मागणी कळंब तहसिलदाराना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची एक प्रत माहितीस्तव उस्मानाबाद जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आली आहे. या निवेदनावर प्रदीप पाटील खंडापूरकर, कालिदास परांडे, भिमराव कोळी, शिवाजीराव गिड्डे, शांतीकुमार बोडगे, विलास शेंडगे, निलकंठ पाटील, राम जवळे, शिवकुमार सोनटक्के आदींच्या स्वाक्ष-या आहेत.