नळदुर्ग :- भरधाव वेगात असलेल्या टँकरने चिरडल्यामुळे एक मजूर जागीच ठार झाला. हा अपघात शनिवार दि. 17 मे रोजी मध्यरात्री एक वाजण्‍याच्‍या दरम्‍यान नळदुर्ग-सोलापूर रस्‍त्‍यावरील तुळजापूर फाट्यावर घडली.
    महमंद गुलाब पठाण (वय 42, रा. इंदिरानगर, नळदुर्ग) असे अपघात मरण पावलेल्‍याचे नाव आहे. यातील महमंद पठाण हे  शनिवारी रात्री एक वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ओलांडून घराकडे जात होते. यावेळी तुळजापूर फाट्याजवळ हैदराबादहून सोलापूरकडे जाणार्‍या टँकर (क्र.एमएच 0४/ एबी ३९८) च्या चालकाने त्यास समोरून जोराची धडक दिली. यात महंमद पठाण हे जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. याप्रकरणी हिरालाल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात टँकर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बजरंग सरपळे करीत आहेत.
 
Top