नळदुर्ग : येथील कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानच्यावतीने नळदुर्ग येथे शनिवार दि. 17 मे रोजी सायंकाळी गोरज या शुभ मुहूर्तावर भव्‍य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा हजारो व-हाडी मंडळीच्‍या उपस्थितीत 19 जोडप्‍यांचा शुभमंगल मोठ्या थाटात पार पडला. याप्रसंगी राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील प्रमुख मान्‍यवर नव वधू-वरास शुभाशिर्वाद देण्‍यासाठी उपस्थित होते.
या विवाह सोहळ्यामध्ये तुळजापूर तालुक्‍यासह परिसरातील नागरिकांनी उत्‍स्‍फुर्तपणे प्रतिसाद दिला. जगदाळे प्रतिष्‍ठानच्‍यावतीने नळदुर्ग येथे पहिल्‍यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्‍या सर्मधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्‍ये 19 जोडप्यांची नावे नोंदविण्‍यात आली. नागरिकांनी सहभागी होवून विवाह सोहळयास चांगला प्रतिसाद दिल्याने भविष्‍यात प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्य हाती घेण्‍यात येणार आहे, त्याकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत कै. दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, नरेंद्र बोरगावर, सुरेश बिराजदार, सुरेश देशमुख, नगराध्यक्ष शहेबाज काझी, सिद्रामप्पा आलुरे गुरुजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    उपस्थित व-हाडी मंडळींच्या जेवणाची उत्‍तम व्यवस्था करण्‍यात आली होती. सायंकाळी सर्वप्रथम साडे पाच ते सहाच्या दरम्यान बौध्द पध्दतीने पाच जोडप्यांचा विवाह लावण्‍यात आला. त्यानंतर सत्कार समारंभ आणि ह. प. भ. गहिनीनाथ महाराज यांचे सर्व जोडप्यांना अशिर्वचन देण्यात आले. त्यानंतर हिंदु पध्दतीने एकूण चौदा जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्‍न झाला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. आशा व अशोक जगदाळे यांच्या हस्ते सर्व नवविवाहीत जोडप्यांना मणी-मंगळसुत्र, जोडव्याचे कन्यादान पध्दतीने वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील, नगराध्यक्ष शहेबाज काझी यांची ही भाषणे झाली.
या विवाह सोहळ्यास धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, न्‍यू चैतन्‍य तरुण मंडळ, वसंतराव नाईक युवा मंडळ, सेवालाल तरुण मंडळ, भोईराज तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, नव चैतन्‍य तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, माऊली तरुण मंडळ, भवानी नगर तरुण मंडळ, जयहिंद तरुण मंडळ व्‍यासनगर, शिवनेरी तरुण मंडळ, व्‍यंकटेश नगर तरुण मंडळ, इंदिरा नगर तरुण मंडळ, दुर्गा माता तरुण मंडळ, अण्‍णा  भाऊ साठेनगर तरुण मंडळ, जवाहर तरुण मंडळ, महाराणा प्रताप तरुण मंडळ, सम्राट ग्रुप तरुण मंडळ, कै. जनार्धन रणे प्रतिष्‍ठान, शिवशाही तरुण मंडळ आदी मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनी विवाह सोहळा पार पाडण्‍यास पुढाकार घेतला.
 
Top