नळदुर्ग :- येथील नगरपालिकेचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्‍यक्ष देविदास राठोड यांचे वयाच्‍या 65 व्‍या वर्षी अल्‍पशा आजाराने निधन झाले.
    देविदास राठोड यांच्‍यावर सोलापूर येथील रुग्‍णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्‍यान त्‍यांचे निधन झाले. राठोड हे दि. 16 फेब्रुवारी 1994 ते 16 डिसेंबर 1996 या कालावधीत नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्‍यक्ष होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. त्‍यांच्‍यावर सोमवार रोजी अंतिमसंस्‍कार करण्‍यात आले. यावेळी त्‍यांचे नातेवाईक, प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.
 
Top