नळदुर्ग -: जळकोट (ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महायुतीच्या ज्योती अरुण लोखंडे यांची बिनविरोध करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणूक प्रक्रियेत अन्य उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने लोखंडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
जळकोट ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव होते. 15 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे. यापूर्वी शोभा अंगुले यांची पहिल्या टर्मसाठी सरपंच म्हणून निवड झाली होती. दुसर्या टर्मसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती लोखंडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळकोट सज्जाचे मंडलाधिकारी ए. जी. कुलकर्णी तर सहाय्यक म्हणून तलाठी एस. डी. जगदाळे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी नूतन सरपंच ज्योती लोखंडे यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम, माजी सरपंच शोभा अंगुले, यशवंत कदम, बबन मोरे, अरुण माने, अंकुश लोखंडे, सुनील माने, अरुण लोखंडे, शिवाजी कदम, उपसरपंच बंकट बेडगे, इंदुमती माळगे, बालिका भोगे, शाबोद्दीन शेख, बाबू चव्हाण, मारूती खारवे, प्रा. शरद गायकवाड, अरुण भोगे आदी उपस्थित होते. निवडप्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामसेवक एस. ए. कोठे, मल्लिनाथ स्वामी, अर्जुन सावंत, अनिल पासोडे, नागनाथ स्वामी, राम दरेकर, अमोल लोखंडे, लक्ष्मण कांबळे, सोमनाथ स्वामी, बळीराम गंगणे आदींनी पुढाकार घेतला.