पांगरी (गणेश गोडसे) :- अवघे जग 21व्या शतकाकडे वाटचाल करून चंद्रावर वास्तव्य करण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करत असताना गाताचीवाडी (ता. बार्शी) येथील ग्रामस्थ मात्र गावातील कानिफनाथांवरील श्रध्देधेपोटी अनेक पिढयांपासुन गावात इंधनरूपी रॉकेलचा कसलाच वापर करण्यास, तयार रॉकेलला हात लावायच म्हटल तरी हात थरथरतात. वीज गेल्यास गावात चिमनीसाठीसुध्दा रॉकेल वापरणे धोकादायक मानुन गोड तेलाचा उजेडासाठी वापर केला जातो. मयताचा अंत्यविधी असो अथवा शेतातील पाणी उपश्याची उपकरणे असो यासाठीसुदधा रॉकेलचा एक थेंबही वापरला जात नाही. जाणीवपुर्वक रॉकेल वापरणे म्हणजे कांहीतरी अनिष्ठ ओढावुन घेणे असा ठाम विश्वास गाताचीवाडी ग्रामस्थांचा तयार झाला आहे. सध्या कानिफनाथांच्या मंदिराच्या जिर्नोदधाराचे काम लोकवर्गणीतुन जोरात सुरू आहे.
तस पाहिल तर प्रत्येक गावाची कांहीतरी वेगळी ओळख ही असतेच. मात्र गाताचीवाडी गावाची रॉकेल न वापरणारे गांव असीच ओळख प्रचलीत आहे. रॉकेल वापरले तर कांहीतरी अघटीत घडते, कानिफनाथ त्याला लगेच दाखला देत. त्यामुळे आजही गाताचीवाडी हया गावाला रॉकेलचा साधा स्पर्शही नाही. गावाच्या प्रवेशद्वारालाच कानिफनाथांचे मंदिर असुन गावात अथवा शिवेत कोणी रॉकेलचा वापर केल्यास त्याला लगेच फटका बसतो. रॉकेलचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास घरे, वाहने यासह आपले डोळेही गमवावे लागल्याच्या विवित्र घटनांना सामोरे जावे लागल्याबाबत अनेक प्रसंग गावातील बुजुर्ग मंडळींनी कथन केले.
कांही वर्षांपुर्वी गावातील रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराने रॉकेलचे बॅरल गावात आणले असता बॅरलनी व त्याच्या काम करणा-या इतर वाहनांनी अचानक पेट घेऊन वाहने जळुन खाक झाली. तसेच रॉकेलचा वापर असणारी वाहने पलटी होतात अथवा टायर फुटतो असे मधुकर गात यांनी सांगितले. गावात नैकरीसाठी आलेल्या शिक्षकाने रॉकेल आणले होते, त्याचा कांही दिवसातच मृत्यु झाल्याचेही ग्रामस्थ सांगतात. एका व्यापा-याने कानिफनाथांच्या मंदिरातच रॉकेलचा दिवा लावला असता मंदिराचा दरवाजा छोटा होऊन पाच तास त्या व्यापा-यास मंदिरातच बसावे लागले असल्याबात ऐकल्याचे एका ग्रामस्थांने सांगितले. गावात कोणी रॉकेल घेऊन प्रवेश केल्यास त्याला गावाची शिव ओलांडेपर्यंत नजरबंदी होते.
अंत्यविधीलाही रॉकेल नाहीः
गावात मयत झाल्यास त्याच्या अंत्यविधीसाठीही रॉकेलचा वापर टाळला जातो. डालडा, तुप, तुराटया, मीठ आदींचा वापर करून अंत्यविधी पार पाडला जातो. लोकांच्या श्रध्देला अंत नसतो असे म्हणतात ते कांही चुकीचे नाही. आम्ही कानिफनाथांच्या इच्छेनुसारच रॉकेल टाळतो म्हणुन गावात शांतता प्रस्थापित असल्याचे लोक सांगतात.
वैशाख महिन्यात मोठी यात्राः
प्रतिवर्षी वैशाख महिन्यात गाताचीवाडीत भव्य यात्रा ग्रामस्थांतर्फे भरवली जाते. मात्र यात्रेतसुदधा वीज गेल्यास रॉकेल वापरले जात नाही. रॉकेलऐवजी घाण्याच्या तेलांचा वापर करून दिवटया पेटवुन त्याच्या उजेडात यात्रा साजरी केली जाते.
गाताचीवाडीतील मुलींना सासरी गेल्यावर रॉकेल वापरण्यास मुभा असली तरी दुसरीकडुन सुन म्हणुन गावात येणा-या महिलेलाही गावात रॉकेल वापरता येत नाही. वीज भारनियमनामुळे ग्रामस्थांना गोडेतेलाचा वापर अलिकडील काळात परवडत नसल्याचे येथील लोकांनी सांगितले. मात्र पर्याय नसल्याने आम्हाला स्वयंपाकापेक्षा जास्त तेल उजेडासाठी संपवावे लागते.
गावच्या रॉकेल कोटयाचे काय? गाताचीवाडीच्या चार पिठयांच्या इतिहासात म्हणजे जवळपास चारशे साडेचारशे वर्षांत गावाला मिळणारे रॉकेल काय होते, ते उचलले जाते का, उचलले जात असेल तर त्याचे काय केले जाते असे अणेक प्रश्न ग्रामस्थांना पडलेले आहेत. मात्र तेही रॉकेलकडे गांभिर्याने पहाताना दिसत नाहीत. प्रशासनाकडुन या गावाला रॉकेल दिल जात नसल्याचे सांगितले जात असले तर रॉकेल जात कुठे हाही प्रश्न आहे.
बाबासाहेब घाडगे पहिले नौकरदार व पोलिसः
विज भारनियमचा फटका व रॉकेलचा बंद वापर यामुळे आजपर्यंतच्या गावाच्या इतिहासात एकजणही म्हणावे असे शिक्षण घेऊन नौकरीस लागलेला नाही. मात्र बाबासाहेब साधु घाडगे या तरूणांच्या रूपाने गावाला पहिला नोकरदार पोलिस लाभला असुन आपण नौकरीच्या ठिकाणीही रॉकेल वापरत नसल्याचे व गावाची परंपरा चालवत असल्याचे बोलताना सांगितले. लोकवर्गणी व शासनाच्या सहभागातुन मंदिराचा जिर्नोध्दार सुरू असुन वीस लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. अजुन दहा लाखाची गरज असल्याचे भाऊ गात यांनी सांगितले.