औरंगाबाद -: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केला असून त्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अधिसूचना जारी करण्याची तारीख- 27 मे 2014, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख-3 जून, नामनिर्देशनपत्राची छाननी- 4 जून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख-6 जून, मतदानाची तारीख-20 जून वेळ सकाळी 8 ते दुपारी 4, मतमोजणीची तारीख- 24 जून सकाळी 8 वाजता, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख- 28 जून 2014.
उपरोक्त निवडणूकीची आचारसंहिता विभागातील सर्व जिल्हयात लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 20 मे रोजी संबंधितांना पत्र पाठविले आहे. त्यात नमूद केल्यानुसार मतदारसंघात मुख्यमंत्री, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना अधिकृत दौरा करता येईल. तथापि या दौऱ्याची आणि मतदारसंघातील त्यांच्या निवडणूक विषयक बाबींची सांगड घातली जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. मतदारसंघातील शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटन अथवा पायाभरणी समारंभास त्यांना उपस्थित राहता येणार नाही. दौऱ्यात मतदारावर प्रभाव पाडणाऱ्या कार्यक्रम अथवा धोरणाची घोषणा करता येणार नाही. निवडणूकीशी निगडीत अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यावर काही निर्बंध लागू राहतील. तसेच मतदारसंघात मंत्री खाजगी दौऱ्यावर असतांना सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना भेटू नये. अशी भेट घेणाऱ्या अधिकाऱ्याविरुध्द सेवानियमानुसार कार्यवाही होऊ शकते तसेच असे अधिकारी जर लोकप्रतिनिधीत्व कायद्यान्वे विशिष्ट जबाबदारी सोपवलेले अधिकारी असतील तर त्यांच्या विरुध्द संबंधित कायद्यान्वये आणखी कार्यवाही होऊ शकते असे स्पष्ट करण्यात आले आहे. मंत्र्यांना खाजगी दौऱ्यांच्या काळात दिवा अथवा सायरन लावलेले वाहन उपलब्ध करुन देण्यावर निर्बध आहेत. या मतदारसंघातील मतदारांशी निगडीत कोणतेही धोरण अथवा कार्यक्रम सरकारी खात्यांना सुरु करता येणार नाही. या मतदारसंघातील प्रचार काळात व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या सूचना तहसिल पातळीवर देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अहवाल निरिक्षकांना सादर केला जाणार आहे.
या शिवाय विधानसभा निवडणूक आचारसंहितेत ज्या प्रमाणे सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या विद्रुपीकरणाच्या बाबत जे नियम लागू आहेत, तेच या निवडणूकीसाठीही लागू राहतील. असे निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.