उस्मानाबाद :- लोकसभा निवडणूक 2014 च्या निवडणूक विषयक सेवा बजावताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबियांना आज जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मदतीचा धनादेश सुपूर्त केला. कळंब येथील प्रभारी गटविकास अधिकारी अशोक माहोर यांच्या पत्नी श्रीमती संगीता मोहोर यांना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात 10 लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
    मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के. नवले आदींची यावेळी उपस्थिती होती.
      तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेर येथील सहशिक्षक दत्तात्रय दगडू वाघमारे (रा. जयभवानीनगर, ढोकी, ता. उस्मानाबाद) यांचाही निवडणूक कालावधीत मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी श्रीमती सविता वाघमारे यांना 10 लाख रुपये मदतीचा धनादेश डॉ. नारनवरे यांनी  ढोकी  येथे जावून सुपूर्त केला तसेच ही मदत मुलांच्या भावी शिक्षणासाठी वापरावी, असा सल्ला दिला व कुटुंबियांचे सांत्वन केले. जि.प.चे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यावेळी उपस्थित होते.
 
Top