उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील निपाणी येथे शुक्रवार, दि. 23 रोजी रेशीम शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता वस्त्रोद्योग (रेशीम) विभागाचे सहसंचालक एस. वाय. कुरसुंगे यांची या मेळाव्यास उपस्थिती राहणार आहे. रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा, मार्गदर्शन आणि अनुदानाबाबत चर्चा यावेळी होणार आहे. औरंगाबाद विभागाचे सहायक संचालक डी. एस. हाके. रेशीम विकास अधिकारी श्रीमती पी.एस. गणाचार्य आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व रेशीम उत्पादक शेतकरी तसेच रेशीम शेती करु इच्छिणा-या शेतक-यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.