उस्मानाबाद -: अशोक आंबादास जाधव (रा. महादेव गल्ली, जामखेड जि. अहमदनगर) या 25 वर्षे वयाच्या युवकाचे 8 फेब्रुवारी,2010 रोजी दुपारी 1-30 ते 2-30 च्या सुमारास महादेव गल्ली, जामखेड येथून अपहरण झाल्याची तक्रार जामखेड पोलीसांत दाखल झाली असून सदर अपह्त युवकाचा शोध घेण्यात आला, परंतू तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नसल्याचे अहमदनगर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक आय.एम. पठाण यांनी कळविले आहे.
याबाबत सदर युवकाची आई सौ. विमलबाई आंबादास जाधव (रा. सोनेगाव ता. जामखेड जि. अहमदनगर ) यांनी आरोपीने फोन करुन बोलावून घेऊन मुलाजवळील रक्क्म रुपये 70 हजार रोख व गळयातील सोन्याची चैन, हातातील दोन अंगठया अशा ऐवजासह पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटल्याचे पोलीसांनी या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे.
अशोक जाधव हा अंगाने सडपातळ, केस काळे, मधून भांग पाडतो, डावे हाताचे पंजाचे तळव्याचे पाठीमागे ओम असे नांव गोंदलेले आहे. रंगाने निमगोरा, चेहरा गोल, नाक मोठे, उंची 165 सें.मी. अंगात पिवळे रंगाचा फुल बाहीचा शर्ट, फुल पॅन्ट, मराठी व हिंदी भाषा बोलतो.
असा युवककोठे आढळून आल्यास पोलीस उप अधीक्षक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अहमदनगर, जिल्हा प्रशासकीय मध्यवर्ती इमारत, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहमदनगर, दुरध्वनी क्र. 0241-2325195 व पोलीस निरीक्षक पठाण भ्रमणध्वनी क्र. 9922414770 यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.